शनिवार, २२ एप्रिल, २०१७

टाईमच्या १०० प्रभावशाली व्यक्तीमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश - २२ एप्रिल २०१७

टाईमच्या १०० प्रभावशाली व्यक्तीमध्ये नरेंद्र मोदींचा समावेश - २२ एप्रिल २०१७

* टाइम या जगप्रसिद्ध मासिकाने जगातील १०० प्रभावशाली व्यक्तींची यादी जाहीर केली असून या यादीत नरेंद्र मोदी आणि पेटीएमचे चे संस्थापक विजय शंकर शर्मा यांचा समावेश झाला आहे. या यादीत भारतातील फक्त दोन व्यक्तींचा समावेश करण्यात आला.

* टाइम या मासिकाच्या यादीत जगभरातील कलाकार, नेते व महत्वाच्या व्यक्तींचा समावेश करण्यात आला.

* या यादीत अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्रपती ब्लाडिनीर पुतीन व ब्रिटिश पंतप्रधान टेरेजा मे यांचाही समावेश करण्यात आला.

* मासिकामध्ये प्रसिद्ध लेखक पंकज मिश्रा यांनी मोदींची माहिती लिहिली असून त्यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष बनण्याआधी नरेंद्र मोदी जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचे पंतप्रधान बनले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.