मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

के विश्वनाथ यांना २०१६ वर्षीचा ४८ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर - २५ एप्रिल २०१७

के विश्वनाथ यांना २०१६ वर्षीचा ४८ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर - २५ एप्रिल २०१७

* साउंड डिझायनर ते दिग्दर्शक असा प्रवास करणारे के विश्वनाथ यांना यंदाचा म्हणजेच २०१६ वर्षीचा ४८ वा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.

* चित्रपट क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. येत्या ३ मे रोजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.

* सुवर्ण कमळ, १० लाख रुपये रोख रक्कम आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार समितीने या पुरस्कारासाठी कलातपस्वी के विश्वनाथ यांची शिफारस केली होती.

* के विश्वनाथ यांचे तेलगू, तामिळ आणि हिंदी अशा तिन्ही भाषांमध्ये मोठ योगदान आहे. यापूर्वी त्यांना पदमश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे.

* काही राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक फिल्मफेअर पुरस्कार, नांदी  पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांनी अभिनेता, लेखक, दिग्दर्शक, साउंड डिझायनर अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी सिनेसृष्टीसाठी अधिक दशक त्यांनी काम केलय.

* के विश्वनाथ यांनी दिग्दर्शित केलेल्या स्वाती मुथम या सिनेमाला ५९ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून ऑफिशियल एंट्री म्हणून पाठविण्यात आला. त्यांनी सरगम, कामचोर, संजोग, जाग उठा इन्सान, ईश्वर, संगीत, धनवान, या गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन के विश्वनाथ यांनी केले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.