सोमवार, १० एप्रिल, २०१७

२०७५ पर्यंत जगातील मुस्लिम सर्वात मोठा धर्म प्यू रिसर्च अहवाल - ७ एप्रिल २०१७

२०७५ पर्यंत जगातील मुस्लिम सर्वात मोठा धर्म प्यू रिसर्च अहवाल - ७ एप्रिल २०१७

* जगभरातील ९४% हिंदू असणाऱ्या भारतामध्ये प्रजनन क्षमता कमी झाल्यामुळे हिंदूंच्या लोकसंख्येमध्ये २०५५ ते २०६० यादरम्यान अचानक घसरण होणार असून, २०७५ पर्यंत जगभरात मुस्लिम सर्वात जास्त होणार असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

* प्यू रिसर्च सेंटरने हा अहवाल सादर केला आहे. या संस्थेकडून लोकसंख्येचा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो.

* पुढील २० वर्षातपेक्षा कमी कालावधीमध्ये मुस्लिम महिला मुलांना जन्म देण्याच्या बाबतीत ख्रिश्चन महिलांना मागे टाकतील. त्यामुळे २०७५ मध्ये इस्लाम हा जगातील सर्वात मोठा धर्म होणार आहे.

* भारतातील घटत्या दरामुळे हिंदूंची संख्या २०५५ ते २०६० मध्ये ३.३ कोटींनी कमी असेल.तर इस्लाम सध्या जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारा देश आहे.

* २०१५ ते २०६० यादरम्यान जागतिक स्तरावर मुस्लिमांच्या लोकसंख्येमध्ये ७०% वाढ होणार असून, ख्रिश्चन लोकसंख्या ३४% वाढणार आहे. यादरम्यान दोन्ही धर्माची संख्या जवळपास सारखी असणार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.