रविवार, २ एप्रिल, २०१७

जगात ३० कोटीपेक्षा अधिक लोक उदासीनतेने ग्रस्त - जागतिक आरोग्य संघटना अहवाल २ एप्रिल २०१७

जगात ३० कोटीपेक्षा अधिक लोक उदासीनतेने ग्रस्त - जागतिक आरोग्य संघटना अहवाल २ एप्रिल २०१७

* सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्यावर प्रतिकूल परिणाम दिसून येत असून, यामुळे जगभरातील जवळपास ३० कोटीपेक्षा अधिक लोक उदासीनतेने ग्रस्त असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामध्ये म्हटले आहे.

* ७ एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर हा अहवाल सादर केला गेला. पाच वर्षात उदासीनता असणाऱ्या लोकांमध्ये १८ टक्क्यांनी वाढ करण्यात आली.

* देशांनी मानसिक आरोग्या बाबतच्या आपल्या दृष्टिकोनामध्ये बदल करण्याची आवश्यकता असून यावर तातडीने उपाय करण्याची गरज आवश्यकता आहे. असे मत जागतिक आरोग्य महासंघटनेच्या महासंचालक मार्गारेट चान यांनी जगाला धोक्याचा इशारा दिला आहे.

* हा दृष्टिकोन बदलण्यासाठी [ नैराश्य : चला चर्चा करू या ] ही मोहीम राबविण्यात येत आहे. नैराश्य आलेल्या व्यक्तीसोबत चर्चा करणे ही उपचाराची पहिली पायरी आहे.

* बोलण्यामुळे संबंधित व्यक्तीमध्ये आत्मविश्वास येण्यास सुरवात होते. असे संघटनेच्या मानसिक आरोग्य आणि मादक पदार्थ दुरुपयोग विभागाचे संचालक शेखर सक्सेना यांनी सांगितले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.