रविवार, ३० एप्रिल, २०१७

महाराष्ट्र शासनाचा शेतकऱ्यांसाठी महावेध प्रकल्पाचा शुभारंभ - १ मे २०१७

महाराष्ट्र शासनाचा शेतकऱ्यांसाठी महावेध प्रकल्पाचा शुभारंभ - १ मे २०१७

* महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी पर्जन्यविषयक माहिती अचूक आणि वेळेवर मिळावी यासाठी वेध हवामानाचा ध्यास शेतकरी कल्याणाचा म्हणजेच [ महावेध ] हवामानविषयक प्रकल्प चालू केला आहे.

[ प्रकल्पाची प्रमुख उद्दिष्टे ]

* राज्यातील सर्व महसुल मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र उभारणीचा प्रकल्प. प्रत्येक महसुल मंडळात [२०६५] स्वयंचलित हवामान केंद्र उभारण्यास सुरुवात.

* पर्जन्यमान, तापमान, सापेक्ष आद्रता, वाऱ्याचा वेग, व दिशा या हवामान घटकाची दर १० मिनिटांनी माहिती उपलब्द होणार आहे.

* स्वयंचलित हवामान केंद्राचे व्यापक जाळे निर्माण होणार असल्याने हवामानाच्या माहितीमध्ये अचूकता निर्माण होणार आहे.

* पीक विमा योजना, हवामान आधारित फळपीक विमा योजना, शेतकऱ्यांना कृषी हवामान सल्ला व मार्गदर्शन, कृषी संशोधन व आपत्ती व्यवस्थापनासाठी उपयुक्त.

* महावेध प्रकल्पाची सार्वजनिक खाजगी भागीदारीतून [ बांधा - मालक व्हा - चालवा ] या तत्वावर स्कायमेट वेदर सर्व्हिसेस प्रा ली मार्फत अंमलबजावणी करण्यात आली आहे.

* प्रकल्पाकरिता शासकीय जमिनीची उपलब्द्ता व स्कायमेट वेदर सर्व्हिससेस यांची आर्थिक गुंतवणूक करण्यात आली आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.