शनिवार, २९ एप्रिल, २०१७

जगातील सर्वाधिक वार्षिक वेतन १२८५ कोटी गुगलच्या सीईओ सुंदर पिचाईचे - ३० एप्रिल २०१७

जगातील सर्वाधिक वार्षिक वेतन १२८५ कोटी गुगलच्या सीईओ सुंदर पिचाईचे - ३० एप्रिल २०१७

* गुगलचे भारतीय वंशाचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यशाचे शिखर गाठत पगाराच्या बाबतीत ते जगात प्रथम क्रमांकावर आहेत. त्यांचे वार्षिक पॅकेज १ हजार २८५ कोटी रुपये एवढे आहे. म्हणजे महिन्याला १०७ कोटी रुपये वेतन मिळते. 

* वेतन म्हणून इतकी मोठी रक्कम असलेले सुंदर पिचाई हे जगातील एकमेव व्यक्ती आहेत. सुंदर पिचाई यांच्याकडे गुगलने ऑगस्ट २०१५ मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची धुरा सोपविली होती. 

* पिचाई हे गुगलच्या अँड्रॉइड, क्रोम, आणि अँड्रॉइड ऍप्स डिव्हिजनचे वाईस प्रेसिडेंट आहेत. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टीम डेव्हलोपमेंट मध्ये पिचाई यांची भूमिका महत्वाची होती. 

* पिचाई यांचा जन्म चेन्नई मध्ये झाला. त्यांचे वडील इंजिनिअर होते. त्यांचे खरे नाव पिचाई सुंदरराजन आहे. त्यांनी २००४ मध्ये गुगल जॉईन केले. 

* त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी आयआयटी खडकपूर मधून घेतली. ते बॅचमधील सिल्वर मेडलिस्ट होते. त्यांनी अमेरिकेतील स्टॅनफर्ड मधून एमएस आणि प्रसिद्ध वॉर्टन यनिवर्सिटीतून एमबीए चे शिक्षण घेतले. 

* पिचाई हे पेन्सिलव्हानिया यूनिव्हर्सिटीमध्ये सायबेल स्कॉलर म्हणून ओळखले जातात. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.