रविवार, २ एप्रिल, २०१७

इंडिया ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद पी व्ही सिंधुकडे - ३ एप्रिल २०१७

इंडिया ओपन सुपर सिरीजचे विजेतेपद पी व्ही सिंधुकडे - ३ एप्रिल २०१७

* ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी व्ही सिंधू हिला इंडिया ओपनच्या अंतिम सामन्यात ऑलिम्पिक चॅम्पियन कॅरोलिना मरिनचा पराभव केला आहे.

* सिंधूने २१-१९, २१-१६ असा विजय मिळवत इंडिया ओपनचे जेतेपद आपल्या नावे केल. रिओ ऑलिम्पिकच्या फायनलमध्ये सिंधूला हरवणाऱ्या कॅरोलिना मरिनाशी तिची पुन्हा एकदा गाठ पडली होती.

* ऑलिम्पिकमध्ये सिंधूचा पराभव करणाऱ्या मरीनला हरवत सिंधूने पराभवाचा वचपा काढला. सिंधूने शनिवारी इंडिया ओपनच्या सुपर सीरिजच्या बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानावर असलेली कोरियन खेळाडू सुंग जी ह्युनचा पराभव करीत अंतिम फेरी गाठली होती. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.