शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

सातारा महाराष्ट्रातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा घोषित - २९ एप्रिल २०१७

सातारा महाराष्ट्रातील पहिला हागणदारीमुक्त जिल्हा घोषित - २९ एप्रिल २०१७

* अवघ्या ११ महिन्यात ५२ हजार शौचालये पूर्ण करणाऱ्या सातारा जिल्ह्याला महाराष्ट्रातील पहिला हागणदारी जिल्हा  म्हणून घोषित करण्यात आले.

* प्रधानमंत्री यांनी अग्रक्रमाने हाती घेतलेल्या हागणदारीमुक्तीच्या चळवळीमध्ये या जिल्ह्यातील सर्वच म्हणजे १,४९० ग्रामपंचायतीनी सहभाग घेतला होता.

* घर तेथे शोचालय या मुख्य उपक्रमाबरोबरच घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन, तसेच सार्वजनिक ठिकाणची वैयक्तिक सुरक्षा पिण्याचे पाणी हे या अभियानातील महत्वपूर्ण घटक आहेत.

* जून २०१६ मध्ये राज्य शासनाने एका वर्षात जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे आव्हाहण केले होते. तर जिल्ह्याने ११ महिन्यातच हे लक्ष्य पूर्ण केले.

* ग्रामपंचायतीची तपासणी करून त्यांचा दर्जा व क्षेत्रात काम करणाऱ्या ४३ त्रयस्थ स्वयंसेवी संस्थांनी पाहणी केली.

* या सर्व संस्थांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीची तपासणी करून राज्य शासनास अहवाल सादर केला.

* २४ एप्रिल रोजी या अहवालावरून सातारा जिल्ह्यास महाराष्ट्रातील सर्व प्रथम हागणदारीमुक्त जिल्हा म्हणून घोषित करण्यात आले.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.