बुधवार, २६ एप्रिल, २०१७

अवकाशवीर पेगी व्हिटसन यांनी अवकाशात सर्वाधिक दिवस व्यतीत करण्याचा विक्रम केला - २६ एप्रिल २०१७

अवकाशवीर पेगी व्हिटसन यांनी अवकाशात सर्वाधिक दिवस व्यतीत करण्याचा विक्रम केला - २६ एप्रिल २०१७

* अमेरिकी अवकाश संस्था नासा च्या अवकाशवीर पेगी व्हिटसन यांनी अवकाशात सर्वाधिक दिवस व्यतीत करण्याचा विक्रम केला आहे. त्यांनी जेफ विल्यम्स यांचा आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात एकूण ५३४ दिवस राहणायचा विक्रम मोडला आहे.

* २००८ मध्ये त्या स्थानकाच्या प्रमुख बनणाऱ्या पहिल्या महिला बनल्या होत्या. मार्च महिन्यात त्यांनी अवकाशात सर्वाधिक काळ चालण्याचा सुनीता विल्यम्स [५० तास ४० मिनिटे ] यांचा विक्रम मोडत ५३ तासांचा विक्रम प्रस्थापित केला होता.

* त्यांनी गेल्या वर्षी पर्यंत एकूण ३७७ दिवस अवकाशात व्यतीत केले होते. तर १७ नोव्हेंबर त्या पुन्हा मोहिमेवर आल्या आणि जेफ विल्यम्स यांचा ५३४ दिवस २ तासांचा विक्रम मोडला.

* त्यांच्या सध्याच्या मोहिमेला सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ मिळाली आहे. त्या पृथ्वीवर परततील त्या वेळी त्यांच्या नावावर अवकाशात ६५० हुन अधिक दिवस राहिल्याचा विक्रम असेल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.