गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

प्रफुल्ल सामंत्रा यांना गोल्डमन पुरस्कार जाहीर - २७ एप्रिल २०१७

प्रफुल्ल सामंत्रा यांना गोल्डमन पुरस्कार जाहीर - २७ एप्रिल २०१७

* पर्यावणवादी सामाजिक न्यायकर्ते प्रफुल्ल सामंत्रा यांना सॅनफ्रान्सिस्को येथे पर्यावरणातील गोल्डमन पुरस्कार जाहीर झाला आहे.

* जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीपासून कार्यरत असलेले सामंत्रा भारतातील पर्यावरण लढ्यातील एक सच्चा कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध आहे.

* ब्रिटनमधील वेदांता रिसोर्सेस या कंपनीशी ओडिशा स्टेट मायनींग कंपनीने २००४ मध्ये करार केला होता. त्यानुसार नियमगिरी पर्वत खोदला जाणार होता.

* या पर्वताच्या परिसरातील कलाहांडी आणि रायगडा जिल्ह्यात बॉक्सइटच्या खाणी आहेत. वेदांता कंपनीने तेथे २ अब्ज डॉलरचा प्रकल्प सुरु करण्याचे ठरविले.

* ओडिशात ८ हजार वर्षांपूर्वीची डोंगरी कोंढ ही आदिवासी जमात नियमगिरी पर्वत परिसरात वास्तव्य करते. तेथील वनांचे जैव वैविध्य त्यांच्यामुळेच टिकून राहते.

* पण जैव वैविध्य नटलेला हा नियमगिरी पर्वत तेथील आदिवासी जाती जमातीच्या या प्रकल्पाचा बळी ठरणार होते.

* अशा परिस्थितीत प्रफुल्ल सामंत्रा यांनी वेदांता कंपनीविरोधात आदिवासींच्या लढ्याचे नेतृत्व केले. प्रफुल्ल यांनी वकिली व्यवसाय घेतल्याने ते ही लढाई न्यायाच्या दरबारात नेऊ शकले. डोंगरी कोंढ लोकांच्या न्याय हक्कासाठी १२ वर्षे लढा दिला.

* हा लढा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी भुवनेश्वर येथे ठिय्या आंदोलन केले. १० मैलांची मानवी साखळी वेदांताला रोखण्यासाठी करण्यात आले.

* मे २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने वेदांता कंपनीच्या विरोधात निकाल दिला. त्या भागात जर कुठलाही प्रकल्प करायचा असेल तर तेथील आदिवासींची परवानगी घ्यावी लागेल. असा दंडक न्यायालयाने घालवून दिला. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.