शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

पंतप्रधान मोदींकडून आधार पे अँपचे उदघाटन - १५ एप्रिल २०१७

पंतप्रधान मोदींकडून आधार पे अँपचे उदघाटन - १५ एप्रिल २०१७

* पंप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर दौऱ्यात आधार पे अँपचे लोकार्पण केलं आहे. आधार पेच्या माध्यमातून आपला आधार क्रमांक वापरून आता आर्थिक व्यवहार करणं शक्य होणार आहे.

[काय आहे आधार पे]

* आधार पे च्या माध्यमातून केवळ अंगठ्याच्या ठशाच्या मदतीने तुम्ही पेमेंट करू शकाल. यासाठी तुमचं बँक खात आधार कार्डशी संलग्न हवे.

* सोबत तुमचा आधार क्रमांकही तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आधार पे फिंगरप्रिंट सेंसरशी जोडलेलं असेल. विशेष म्हणजे प्लॅस्टिक मनी किंवा मोबाईल अँपची आवश्यकता नसेल.

* भीमअँप पेक्षा काही वेगळी असलेली ही योजना मुख्यत्वे दुकानदारासाठी असेल. ग्राहकांकडे स्मार्टफोन नसला तरी बायोमेट्रिक स्कॅनच्या मदतीने पेमेंट करणं शक्य होणार आहे.

* पुढच्या सहा ते नऊ महिन्याच्या कालावधीत ७०% दुकानांमध्ये आधार पे सुरु करण्याचे लक्ष आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.