मंगळवार, २५ एप्रिल, २०१७

भारतात इंटरनेट वापरात दिल्ली देशात प्रथम क्रमांकावर - २५ एप्रिल २०१७

भारतात इंटरनेट वापरात दिल्ली देशात प्रथम क्रमांकावर - २५ एप्रिल २०१७

* इंटरनेट अँड मोबाईल असोशिएशन ऑफ इंडिया [IAMAI] आणि नेल्सन यांनी प्रकाशित केलेल्या इंडेक्स ऑफ इंटरनेट रेडिनेस ऑफ इंडियन स्टेट्स असा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला.

* या अहवालानुसार इंटरनेट वापरामध्ये एकंदर सज्ज असलेल्या वापरामध्ये दिल्लीने आघाडीचे स्थान मिळविले आहे. गेल्या वर्षी हे स्थान महाराष्ट्राकडे होते. छोटी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशामध्येही दिल्लीचे या बाबतीतले स्थान आघाडीचे असून सर्व राज्यांचा विचार करताही दिल्लीचा क्रमांक पहिला लागतो.

* या यादीत दिल्ली नंतर अनुक्रमे कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू यांचा क्रमांक लागतो. उत्तम ई पायाभूत सुविधा आणि ई सहभाग यांच्यामुळे दिल्लीला प्रथम स्थान मिळाले आहे असे अहवालात नमूद केले आहे.

* अहवालानुसार पुढील पाच वर्षात भारत हा इंटरनेट वापरणाऱ्या देशाच्या यादीत पहिल्या ५ क्रमांकात जाऊन पोहोचेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

* लहान राज्यांचा विचार केला असता दिल्ली पाठोपाठ चंदीगढ आणि पुडुचेरी चा नंबर लागतो. ईशान्येकडील राज्यांचा या अहवालात बराच खालचा क्रमांक आहे. ईशान्य भागाचाच विचार केला तर नागालँड सर्वात आघाडीवर असून त्यानंतर मणिपूर आणि त्रिपुराचा क्रमांक लागतो.

* कर्नाटक, दिल्ली आणि महाराष्ट्र या तीन राज्यात सर्वाधिक डिजिटल नवउद्योग असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. देशातील एकूण २४२ नवउद्योग यांच्यापैकी ६१ उद्योग तामिळनाडूमध्ये आहेत.

* आज भारत जगातील सर्वाधिक वेगाने डिजिटल होत असलेल्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सध्या  १५५ स्थानावर असलेला भारत येत्या ५ ते ६ वर्षात ५ व्या स्थानावर येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.