बुधवार, १९ एप्रिल, २०१७

राज्य शासनाचे २०१७ चे ५४ वे जीवन गौरव पुरस्कार जाहीर - २० एप्रिल २०१७

राज्य शासनाचे २०१७ चे ५४ वे जीवन गौरव पुरस्कार जाहीर - २० एप्रिल २०१७

* राज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा यंदाचा राजकपूर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेत्री सायरा बानो व राज कपूर विशेष योगदान पुरस्कार सुप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांना जाहीर झाला आहे.

* चित्रपती व्ही शांताराम जोवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले आणि व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार अभिनेते अरुण नलावडे यांना जाहीर करण्यात आला आहे.

* मराठी आणि हिंदी चित्रपट क्षेत्राच्या उत्कर्षासाठी ज्यांनी दीर्घकाळ आपले आयुष्य व्यतीत केलेल्या तसेच अभिनय, संगीत, निर्मिती, दिग्दर्शन या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींना हे पुरस्कार देऊन गौरविण्यात येते.

* जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप ५ लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह तर, विशेष योगदानाचे स्वरूप ३ लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे आहे. हे सर्व पुरस्कार राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.