शुक्रवार, १४ एप्रिल, २०१७

मोदींच्या हस्ते नागपुरात विविध प्रकल्पांचे भूमिपूजन - १५ एप्रिल २०१७

मोदींच्या हस्ते नागपुरात विविध प्रकल्पांचे भूमिपूजन - १५ एप्रिल २०१७

* पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १४ एप्रिलचे बाबासाहेबांचे निमित्त साधून नागपुरात दाखल झाले व त्यांनी विविध प्रकल्पांचे भूमिपूजन व उदघाटन केले.

* चंद्रपूर जिल्ह्यातील कोराडी आणि परळीतील ३ औष्णिक वीजप्रकल्पाचे नवीन ऊर्जासंचाचे लोकार्पण केले.

* नागपूरजवळ मौजे वारंगा या ठिकाणी ९८ एकर जागेत ट्रिपल आयटी तयार होणार आहे. देशात अशाप्रकारे २० आयआयटी उभारली जात आहेत.

* नागपूरमध्ये आयआयएम अहमदाबादच्या मदतीने नवीन इन्स्टिटयूट सुरु होणार आहे. या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले आहे. आयआयएम नागपूरला मिहान परिसरात ३५ एकर जागा देण्यात आली आहे.

* दिल्लीतील एम्सच्या धर्तीवर नागपुरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु होणार आहे. या हॉस्पिटलला मिहान परिसरात १५० एकर जागा मिळाली आहे. या ठिकाणी २६० बेड्सचे अत्याधुनिक हॉस्पिटल होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.