बुधवार, ५ एप्रिल, २०१७

रेल्वेच्या विकासासाठी रेल्वे विकास प्राधिकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - ६ एप्रिल २०१७

रेल्वेच्या विकासासाठी रेल्वे विकास प्राधिकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - ६ एप्रिल २०१७

* केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे विकास प्राधिकरणाला मंजुरी दिली आहे. रेल्वे विकास प्राधिकरण ही स्वायत्त संस्था असेल.

* या प्राधिकरणाचे मुख्य काम हे रेल्वेचे भाडे ठरवण्याचे असेल. यासोबतच रेल्वे प्रवाशांच्या हिताचे रक्षण करणे, प्रवासी भाड्याशिवाय अन्य मार्गातून उत्पन्न वाढविणे आणि त्याविषयी सूचना करणे अशी कामे या प्राधिकरणाने सोपविण्यात आली आहे.

* रेल्वेच्या भाड्यात वाढ करण्याचे अधिकर आता रेल्वे मंत्र्याकडे राहणार नाही. य प्राधिकरणामुळे रेल्वेत सुधारणा येईल. तसेच पारदर्शकता येईल असा दावा केला जात आहे.

* केंद्रीय मंत्रीमंडळाकडे पाठवलेल्या प्रस्तावानुसार रेल्वे विकास प्राधिकरणात १ अध्यक्ष आणि ३ सदस्य असतील. या सर्वांची ५ वर्षासाठी नियुक्ती केली जाईल.

* रेल्वे तिकीट दर आणि माल भाड्याचा वेळोवेळी आढावा घेऊन त्यात बदल करणे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.