रविवार, ३० एप्रिल, २०१७

२०२२ मध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेत ४ थ्या क्रमांकावर आयएमएफ अहवाल - ३० एप्रिल २०१७

२०२२ मध्ये भारत जागतिक अर्थव्यवस्थेत ४ थ्या क्रमांकावर आयएमएफ अहवाल - ३० एप्रिल २०१७

* वेगवान अर्थव्यवस्था असणारा भारत देश येत्या ५ वर्षात म्हणजेच २०२२ पर्यंत विकसित जर्मनीला मागे टाकत जगातील आघाडीच्या ५ अर्तव्यवस्थमध्ये आपले स्थान पटकावेल. असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी [IMF - इंटरनॅशनल मॉनेटरी फंड] यांच्या अहवालात सांगितले आहे.

* सध्या जगातील आघाडीच्या ५ अर्थव्यवस्थेमध्ये अमेरिका, चीन, जपान, आणि ब्रिटनचा समावेश आहे. भारत सध्या ७ व्या स्थानावर आहे. भारत पुढे गेल्यास जर्मनी आणि ब्रिटनचे स्थान संपुष्ठात येईल.

* परंतु अहवालात म्हटले आहे की भारतासमोर काही समस्या आहेत त्या भारताने दूर केल्या पाहिजे. यामध्ये करप्रणालीत सुधारणा घडवून आणणे, कमी झालेली उत्पादकता वाढविणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे, तसेच कॉर्पोरेट क्षेत्रातील गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक वाढविणे याचा समावेश आहे.

* तसेच सरकारने जीएसटीची प्रक्रिया पूर्ण केली असून ते भारतासाठी नक्कीच चांगले आहे. यामुळे व्यापार वाढीस लागेल असे आयएमएफचे उपव्यवस्थापक टाओ झॅक हे म्हणाले.

* गेल्या काही वर्षात भारताने भरपूर सुधारणा आणि अनुकूल व्यापार अटी सोबत निर्णय घेऊन विकास वेगाने वाढविला आहे. तसेच भारताचा आर्थिक विकास दर २०१७-१८ यामध्ये ७.२ एवढा राहील असे आयएमएफच्या अहवालात म्हटले आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.