रविवार, २ एप्रिल, २०१७

नवीन मोटार वाहन सुधारणा कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - २ एप्रिल २०१७

नवीन मोटार वाहन सुधारणा कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी - २ एप्रिल २०१७

* नवीन मोटार वाहन सुधारणा कायद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली असून त्यांचे नियम खालील प्रमाणे आहेत.

[ नवीन मोटार वाहन कायद्याच्या तरतुदी ]

* अल्पवयीन मुलांनी गाडी चालविल्याने होणारे अपघात रोखण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली असून यानुसार अल्पवयीन चालवत असलेल्या गाडीची नोंदणी रद्द होईलच. तसेच अल्पवयीन चालकामुळे अपघात झाल्यास त्यांच्या पालकांकडून २५ हजार रुपयांचा दंड किंवा तीन वर्षाच्या तुरुंगाची शिक्षा अशी तरतूद करण्यात आली आहेत.

* दुचाकीवर बसलेल्या चार वर्षावरील लहान मुलासाठी हेल्मेट सक्ती.

* दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर न केल्यास १ हजार रुपयाचा दंड तसेच तीन महिन्यासाठी वाहन परवाना रद्द केला जाऊ शकतो. सीट बेल्टचा वापर न करणे, सिग्नल मोडणे, यासाठीची हीच शिक्षा होऊ शकते.

* गाडी चालवताना मोबाईलवर बोलताना सापडल्यास ५ हजार रुपयाचा दंड मिळेल.

* रस्ते अपघातातील पीडितांना मिळणारी नुकसान भरपाई वाढणार आहे. मृत्यू झाल्यास १० लाख तर गंभीर जखमी झाल्यास ५ लाख रुपयांची भरपाई मिळू शकणार.

* हिट अँड रन प्रकरणात मृत्यू झालेल्यापैकी नातेवाईकांना २ लाख तर जखमी झालेल्याना ५० हजार रुपयाची भरपाई.

* वाहन परवाना तसेच वाहन नोंदणीला आधार शी जोडणार. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.