शनिवार, १५ एप्रिल, २०१७

महाराष्ट्रातील स्त्री - पुरुष जन्मदरात घट - १६ एप्रिल २०१७

महाराष्ट्रातील स्त्री - पुरुष जन्मदरात घट - १६ एप्रिल २०१७

* २०१६ मध्ये तब्बल ८% नी जन्मदर घसरला आहे. राज्य आयोग विभागाकडून जारी करण्यात आलेल्या अहवालातून ही माहिती सादर करण्यात आली. अहवालानुसार जिथे २०१५ मध्ये १००० मुलांमागे ९०७ मुली होत्या तिथे २०१६ मध्ये हा आकडा ८९९ वर पोहोचला आहे.

* नागरी नोंदणी प्रणालीवर आधारित या अहवालानुसार पुण्यामध्ये २०१४ पर्यंत स्त्री पुरुष जन्मदरात प्रगती होत असल्याचे दिसते.

* पण २०१५ मध्ये हा आकडा १०००/८९१ वर आला. २०१६ मध्ये ५३ टक्के घसरून १०००/८३८ वर आला. स्त्री पुरुष जन्मदरात घसरण होणाऱ्या राज्यांमध्ये वाशीम पहिल्या क्रमांकावर असून ६२% खाली आला आहे. त्यानंतर उस्मानाबाद व पुणे यांचा क्रमांक असून ५३% खाली आला आहे.

* मुबंईत जन्मदर १०००/९३६ आहे. महाराष्ट्रातील मुख्य शहरामध्ये जन्मनोंद १००% आहे. मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये १००% नोंदणी होते पण ग्रामीण भागात ते तेवढी होत नाही.

* दुसरीकडे भंडारा येथे जन्मदरात मात्र कमालीची वाढ पाहायला मिळते. तर बीडमध्ये तो अत्यंत खालावलेला दिसतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.