रविवार, ३० एप्रिल, २०१७

उत्तरप्रदेशमध्ये मुलींसाठी भाग्यलक्ष्मी योजना - ३० एप्रिल २०१७

उत्तरप्रदेशमध्ये मुलींसाठी भाग्यलक्ष्मी योजना - ३० एप्रिल २०१७

* उत्तरप्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कन्याजन्माचे स्वागत करताना गरीब कुटुंबात मुलगी जन्माला आली की ५० हजार रुपयाचा बॉण्ड देण्याचे जाहीर केले. या अंतर्गत भाग्यलक्ष्मी योजना सुरु करण्यात येणार आहे. 

* मुलीच्या आईलाही ५१०० रुपये मिळणार आहेत. उत्तर प्रदेश सरकारच्या महिला विभागातर्फे या योजनेसाठी आराखडा तयार करण्याचे काम सुरु झाले आहे. 

* योगी सरकारने जनकल्याणाचे अनेक निर्णय घेतले आहे. कन्याजन्माच्या स्वागताप्रमाणेच बुंदेलखंडमधील पाणी समस्या सोडवण्यासाठी केन बेटवा जोडकालवा प्रकल्प लवकरच सुरु करण्याची सूचना केली आहे. 

* राज्यातील प्राथमिक शिक्षणामध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याने शाळांमध्ये जाऊन तपासणी करण्याचा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.