गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उडाण योजनेचा शुभारंभ - २८ एप्रिल २०१७

पंतप्रधान मोदींच्या हस्ते उडाण योजनेचा शुभारंभ - २८ एप्रिल २०१७

* शिमला येथे जब्बारहट्टी विमानतळावर शिमला ते दिल्ली या विमानाला हिरवा झेंडा दाखवून [ उडान ] योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोदींनी सब उडे सब जुडे असा नारा दिला.

* उडानच्या [ उडे देश का आम नागरिक ] माध्यमातून हवाई सफर हा चप्पल घालणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांनाही हवाई प्रवास शक्य व्हावा असे या योजनेचे ध्येय आहे.

* आता या पुढच्या टप्प्यात कडप्पा ते हैदराबाद आणि नांदेड ते हैद्राबाद, मुंबई ते नांदेड या विमानसेवेचे उदघाटन मोदी यांनी केले.

[ उडान योजना उद्दिष्ट्ये ]

* विमानाचा प्रवासाचा खर्च प्रति तास २५०० रुपयांपर्यंत मर्यादित करणारी उडान ही मोदी सरकारी महत्वाकांक्षी योजना आहे.

* या योजनेअंतर्गत ५०० किलोमीटरपर्यंतचा विमान प्रवास फक्त २५०० रुपयांतर्गत करता येणार आहे.

* देशातील ७० विमानतळे उडान अंतर्गत जोडली गेल्यामुळे सर्व क्षेत्रांना त्याचा फायदा होणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.