शुक्रवार, २८ एप्रिल, २०१७

काही महत्वपूर्ण नवीन चालू घडामोडी - २९ एप्रिल २०१७

काही महत्वपूर्ण नवीन चालू घडामोडी - २९ एप्रिल २०१७

* सण २०१७ चा बिर्ला फाउंडेशनचा व्यास सन्मान सुरेंद्र वर्मा हिंदी साहित्यिक यांना प्रदान करण्यात आला.

* २७ फेब्रुवारी २०१७ या जागतिक मराठी भाषा दिनाची संकल्पना संगणक आणि महाजालावर मराठी ही होती.

* सन २०१६ चा मराठी भाषा अनुवाद साहित्य अकादमी पुरस्कार मिलिंद चंपानेरकर यांना प्रदान करण्यात आला.

* बालमृत्यू नियंत्रणात आणण्यात महाराष्ट्र राज्याचा देशात दुसरा क्रमांक आहे.

* देशातील पहिली तरंगती शाळा मणिपूर राज्यात सुरु झाली.

* महिला विश्वचषक पात्रता स्पर्धा २०१७ मालिकावीर खेळाडू - सुनी लूस ही होय.

* मेडी ट्रॅव्हल - २०१७ ही आयुर्वेदिक परिषद नवी दिल्ली येथे आयोजित केली होती.

* भारतातील सर्वोच्च तपास यंत्रणा सीबीआय होय.

* महिला विश्वकप पात्रता स्पर्धा २०१७ अंतिम सामन्यातील सामनावीर खेळाडू दीप्ती शर्मा होय.

* सर्वोच्च न्यायालयाने शिर्डी संस्थांनचे कामकाज पाहण्यासाठी आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा आदेश दिला.

* १ एप्रिल २०१७ पासून २ लाख खरेदीच्या जास्तीच्या सोने खरेदीवर १% टिसीएस टॅक्स लागू होणार आहे.

* राकेश हरिप्रसाद चौरसिया हे प्रसिद्ध बासरीवादक आहेत.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.