गुरुवार, ६ एप्रिल, २०१७

जीएसटीची चार विधेयके राज्यसभेत एकमताने मंजूर - ७ एप्रिल २०१७

जीएसटीची चार विधेयके राज्यसभेत एकमताने मंजूर - ७ एप्रिल २०१७

* जीएसटीची चार विधेयके राज्यसभेत ध्वनिमताने मंजूर करून लोकसभेकडे पाठविण्यात आली. विरोधकांच्या दुरुस्त्याही सभागृहाने नामंजूर केल्या. यानंतर राज्यांना विधानसभेत प्रस्तुत विधेयके मंजूर होतील.

* जीएसटीमध्ये कृषी क्षेत्र वगळले असून उपभोक्त्याच्या हक्काचे व हिताचे पूर्णतः रक्षण केले जाईल. अशी ग्वाही सरकारने दिली आहे.

* अर्थमंत्री यांच्यानुसार जीएसटी परिषद देशात पहिलीच अशी परिषद आहे की ज्यात संघराज्य कारप्रणालीशी संबंधित सारे निर्णय होणार आहे.

* त्यात केंद्राकडे १/३ व राज्याकडे २/३ मताधिकार आहेत. जीएसटीमुळे ज्या राज्यांना महसुली नुकसान सोसावे लागेल त्यांना पहिली ५ वर्षे नुकसानभरपाई देण्याची तरतूद देण्यात येईल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.