सोमवार, १० एप्रिल, २०१७

कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान मध्ये फाशीची शिक्षा - ११ एप्रिल २०१७

कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान मध्ये फाशीची शिक्षा - ११ एप्रिल २०१७

* हेरगिरी आणि विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून वर्षभरापूर्वी बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांना पाकिस्तान मध्ये फाशीची शिक्षा ठोठावली आहे.

* कुलभूषण पवई भागात राहणारे असून त्यांचा हेरगिरीशी काहीही संबंध नाही, या घटनेनंतर भारताने आपल्या ताब्यात असलेले १२ पाकिस्तानी कैदी न सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

* कुलभूषण जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी होते. ते भारताच्या रिसर्च अँड अनालिसिस विंग रॉ या संस्थेसाठी हेरगिरी आणि विघातक कृत्याची तयारी करताना पकडले गेले होते. असा पाकिस्तानचा दावा आहे.

* परंतु कुलभूषण यांनी गुन्हा कबूल केल्याचा दावा करण्यात आला आहे. असे पत्रकात म्हटले आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.