रविवार, १६ एप्रिल, २०१७

केंद्र सरकारचे भीम अँप आता मराठीत - १७ एप्रिल २०१७

केंद्र सरकारचे भीम अँप आता मराठीत - १७ एप्रिल २०१७

* ऑनलाईन व्यवहारासाटी केंद्राने लॉन्च केलेलं भीम अँप आता मराठीतही उपलब्द झाल आहे. देशातील तीन प्रादेशिक भाषांचा नव्याने समावेश केल्याने आता यामध्ये १२ भाषांचा सामावेश झाला आहे.

* नॅशनल पेमेंट कौन्सिल ऑफ इंडिया अर्थात [NPCI] ने या अँपचे अपग्रेड व्हर्जन लॉन्च केले आहे. भीम अँप हे नवं व्हर्जन अँड्रॉइड आणि आयओएस युझरसाठी असून तीन नवीन फीचर्सचा यात सामावेश करण्यात आला आहे.

* कॅशलेस व्यवहारासाठी कुणी भीम अँप वापरात असेल तर त्यांना भाषेचा अडसर येऊ नये, यासाठी भीम अँपमध्ये आणखी तीन प्रादेशिक भाषांचा वापर करण्यात आला आहे.

* यामध्ये आता मराठी, पंजाबी आणि आसामी भाषांचा नव्याने समावेश केला आहे. आता एकूण १२ भाषेमध्ये हे अँप उपलब्द आहे.

* पैसे पाठ्वण्यासाठी फोन कॉन्टॅक्सचा वापर -  भीम अँप वापरणारे आता बेनिफिशियरी निवडीसाठी आपल्या फोनमधील कॉन्टॅक्सचा वापर करू शकतात मात्र ज्यांचे मोबाईल नंबर भीम अँपमध्ये नोंदवलेले असतील, त्यांनाच बेनिफिशियरी म्हणून निवडता येईल.

* QR कोड या अँप मध्ये QR कोडचा पर्यायही समाविष्ट केला आहे. त्यामुळे स्कॅन अँड पे साठी हा पर्याय उपयुक्त ठरणार आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.