शनिवार, २९ एप्रिल, २०१७

काही महत्वाच्या समित्या/आयोग - २९ एप्रिल २०१७

काही महत्वाच्या समित्या/आयोग - २९ एप्रिल २०१७

* बी सी खटूवा समिती - महाराष्ट्रातील रिक्षा, टॅक्सी चे भाडेसूत्र ठरविण्यासाठी महाराष्ट्र सरकारने खटुवा समिती स्थापन केली आहे.

* रतन वट्टल समिती - केंद्र सरकारने देशात डिजिटल पेमेंट्सना प्रोत्साहन मिळावे या संबंधी शिफारशी देण्यासाठी रतन वट्टल समिती स्थापन केली आहे.

* प्रा टिमोथी गोन्साल्विस समिती - केंद्र सरकारने  आयआयटी या उच्च संस्थांमध्ये मुलींना आरक्षण द्यावे की नाही  यासंबंधी शिफारशी देण्यासाठी ही स्थापन केली आहे. या समितीने आयआयटी संस्थांमध्ये २०% आरक्षण देण्याची शिफारस केली आहे.

* चंद्रबाबू नायडू समिती - ही देशात डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन मिळावे यासंबंधी उपाय सुचविण्यासाठी या समितीची स्थापन केली आहे.

* के पी बक्षी समिती - ७ वा वेतन आयोग महाराष्ट्रात लागू करण्यासंबंधी शिफारशी देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने १६ जानेवारी २०१७ रोजी या समितीची स्थापना केली.

* लेफ्टनंट  जनरल निवृत्त डी बी शेकटकर समिती - ही समिती केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने भारतीय लष्कराची लढाऊ क्षमता वाढावी आणि संरक्षण यांचावर होणाऱ्या खर्चाचे संतुलन राखण्यासाठी ही समिती सादर केली आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.