गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन - २८ एप्रिल २०१७

ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचे निधन - २८ एप्रिल २०१७

* रुपेरी पडदा गाजविणारे आणि ऑल टाइम हॅण्डसम अशी ओळख असलेले विनोद खन्ना यांचे गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांना कॅन्सर झाला होता.

* त्यांचा जन्म सध्याच्या पाकिस्तानातील पेशावरमध्ये उद्योगपतीच्या घरात ६ ऑकटोम्बर १९४६ साली झाला.  विनोद खन्नाने १९६८ साली मन का मीत या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यात त्यांनी खलनायकाची भूमिका बजावली.

* हाथ की सफाई सिनेमासाठी त्यांना १९७५ साली सर्वोत्कृष्ट सहकलाकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. १९८१ साली कुर्बानीसाठी सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरविण्यात आले.

* विनोद खन्ना यांनी राजकारणात सुद्धा नशीब आजमावले. सध्या ते पंजाबच्या गुरुदासपूर मतदारसंघातून भाजपचे खासदार होते.

* विनोद खन्ना यांनी मेरे अपने, कुर्बानी, परब और पश्चिम, रेशमा और शेरा, हाथ की सफाई, हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, अमर अकबर ऍंथोनी, यासारख्या सिनेमात काम केलं आहे.

* विनोद खन्ना यांची करिअरची सुरवात निगेटिव्ह भूमिकेने झाली, नंतर ते हिरो बनले. विनोद खन्ना यांनी १९७१ साली हम तुम और वो मध्ये प्रमुख भूमिका साकारली.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.