गुरुवार, २७ एप्रिल, २०१७

मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लसीची चाचणी - २७ एप्रिल २०१७

मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लसीची चाचणी - २७ एप्रिल २०१७

* मलेरियाला प्रतिबंध करण्यासाठी तयार केलेली जगातील पहिली लसीची चाचणी ही प्रथम घाना, केनिया आणि मलावी या आफ्रिका खंडातील तीन देशामध्ये दिली जाणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने [WHO] ने जाहीर केले आहे.

* या तीन देशामध्ये मलेरियाचा धोका अधिक असून, पुढील वर्षीपासून या लसीची प्रायोगिक स्तरावर चाचणी सुरु होणार आहे.

* मलेरिया पसरण्यास कारणीभूत असलेल्या डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदाणी आणि डास मारण्याचा फवारा असे दोन उपाय योजले जातात. त्यामुळे ग्लॅस्को स्मिथ या कंपनीने आरटीएस ही लस तयार केली आहे.

* पुढील वर्षीपासून दिली जाणारी मलेरियावरील ही लस ५ ते १७ महिन्यांच्या मुलांना दिली जाणार आहे. ही लस तयार करण्यासाठी गेली अनेक वर्षे संशोधक प्रयत्न करत होते आणि यासाठी कोट्यवधी डॉलर खर्च आला आहे.

* २०४० पर्यंत जगभरातून मलेरियाची समस्या दूर करण्याचे WTO चे लक्ष्य आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.