बुधवार, २६ एप्रिल, २०१७

जळगावमध्ये राज्य सरकार उभारणार मेडिकल हब - २६ एप्रिल २०१७

जळगावमध्ये राज्य सरकार उभारणार मेडिकल हब - २६ एप्रिल २०१७

* जळगाव येथे शासकीय एकात्मिक वैद्यकीय शैक्षणिक संकुल मेडिकल हब उभारण्यासंदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

* तसेच या निर्णयामुळे उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना प्रगत वैद्यकीय शिक्षण, आरोग्यविषयक सुविधा उपलब्द होणार आहेत. अशी माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

* जागतिक आरोग्य संघटनेच्या मानकाप्रमाणे प्रतिहजार लोकसंख्यसाठी ४ डॉक्टर्स असणे आवश्यक आहे.

* राज्यात हेच प्रमाण ०.६४ इतके आहे. त्यामुळे नवीन आरोग्य विज्ञान महाविद्यालयाची निमिती करून डॉक्टरची संख्या वाढविणे आवश्यक आहे.

* उत्तर महाराष्ट्रात प्रति लाख लोकसंख्यमागे आरोग्य विज्ञान महाविद्यालयाची प्रवेश क्षमता अवघी ०.५४ एवढी आहे. त्यामुळे जळगावात मेडिकल हब सुरु करण्याचा निर्णय शासनामार्फत घेण्यात आला आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.