रविवार, १६ एप्रिल, २०१७

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन - १७ एप्रिल २०१७

जगातील सर्वात वयोवृद्ध व्यक्तीचे निधन - १७ एप्रिल २०१७

* जगातील सर्वात वयोवृद्ध व बहुदा एकोणिसाव्या शतकात जन्म झालेल्या शेवटच्या व्यक्तीचे वयाच्या ११७ व्या वर्षी निधन झाले. इटलीतील एम्मा मार्टिना ल्युईगिया मोरानो या महिलेचा जन्म २९ नोव्हेंबर १८९९ साली झाला.

* त्या गिनीज वर्ल्डस रेकॉर्ड्सप्रमाणे सर्वात वयोवृद्ध असलेल्या व्यक्ती व महिला होत्या. मोरानो यांचे निधन झाले असून गेल्या वर्षी मे पर्यंत त्यांचे नाव गिनीज बुकात सर्वात वयोवृद्ध व्यक्ती म्हणून होते.

* वयोवृद्धता संशोधन गटाने केलेल्या यादीनुसार १९०० मध्ये जमैकात जन्मलेल्या व्हायोलेट ब्राऊन ह्या आता जिवंत व्यक्तीत सर्वात वयोरुद्ध आहेत. त्यांचे वय ११३ वर्षे ३७ दिवस आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.