सोमवार, १० एप्रिल, २०१७

६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांची घोषणा - ९ एप्रिल २०१७

६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार चित्रपटांची घोषणा - ९ एप्रिल २०१७

* राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये हिंदीतील नीरजा, तर मराठीतील कासव या मराठी चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

* कासव या चित्रपटाला सुवर्णकमळ मिळाले असून, सुपरस्टार अभिनेता अक्षय कुमारला संपूर्ण कारकिर्दीत प्रथमच सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. रुस्तम या चित्रपटाच्या भूमिकेसाठी अक्षयला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

* नुकतीच ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा करण्यात आली. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार दंगल मधील झायरा वासिम हिला मिळाला असून जम्मू काश्मीरच्या मेहबुबा मुफ्ती यांची भेट घेतल्याने चर्चेत आली आहे.

* सर्वोत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्सचा पुरस्कार शिवायला मिळाला असून. सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता पूरस्कार दशक्रियासाठी मनोज जोशीने पटकावला.

* व्हेंटिलेटरला सर्वोत्कृष्ट व्हिडीओ रेकॉर्डिंग, साउंड मिक्सिंगचा पुरस्कार मिळाला. तर सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा पुरस्कार धनक या चित्रपटाला मिळाला.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.