शनिवार, १ एप्रिल, २०१७

१ एप्रिलपासून पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण होणार - १ एप्रिल २०१७

१ एप्रिलपासून पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण होणार - १ एप्रिल २०१७

* १ एप्रिलपासून पाच सहयोगी बँकांचे विलीनीकरण होणार असून यात स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ पतियाळा ह्या बँकांचा समावेश आहे.

* स्टेट बँक ऑफ हैद्राबादचा महाराष्ट्र आणि तेलंगणात पसारा आहे. स्टेट बँक ऑफ त्रावणकोर केरळातील प्रमुख बँक आहे. स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर राजस्थानात तर स्टेट बँक ऑफ पतियाळाचे पंजाबात मोठे जाळे आहे. स्टेट बँक ऑफ त्रवणकोरचे १४ हजार कर्मचारी आहेत. तर स्टेट बँक ऑफ हैद्राबादचे १८ हजार कर्मचारी आहेत.

* आता या सर्व बँकांचे नाव संपुष्टात येऊन एसबीआय होणार आहे. ग्राहकांना कुठलीही चिंता करण्याची गरज नाही असे बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.