सोमवार, १० एप्रिल, २०१७

इंटेल देणार भारतातील इंजिनिअर्सना AI प्रशिक्षण - ७ एप्रिल २०१७

इंटेल देणार भारतातील इंजिनिअर्सना AI प्रशिक्षण - ८ एप्रिल २०१७

* डेटा हा नवीन युगातील तेल आहे. तेलाच्या वापरानंतर जगाची अर्थव्यवस्था बदलली. नवे विकसित देश उदयाला आले. नव्या युगात डेटाचे व्यवस्थापन असेच बदल घडेल.

* नव्या युगातील डेटा नावाच्या तेलाची सर्वात मोठी शुद्धीकरण फॅक्टरी म्हणून इंटेल कोर्पोरेशनकडे पहिले जाते.

* आर्टिफिशियल इंटेलिजन्स [AI] ची पहाट होण्याचा सध्याचा हा काळ आहे. येत्या ५ वर्षात २०२२ पर्यंत एआयची उलाढाल तब्बल १२५० अब्ज रुपयावर जाईल.

* उगवत्या एआय क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लागणार आहे. त्यासाठी इंटेल कंपनी पुढे सरसावली आहे.

* भारत आणि चीन कुशल मनुष्यबळाचा वापर करून एआयचा विकास करणे आणि एआयचा वापर या दोन्ही विशाल देशामध्ये जास्तीत जास्त वाढविणे यासाठी कंपनी काम करणार आहे.

* भारतात बंगळुरू येथे इंटेल इंडिया च्या ऑफिसमध्ये ५ एप्रिल हा जगातील पहिला एआय दिन साजरा करण्यात आला. भारताला या योजनेत सामावून घेण्यासाठी इंटेल १५००० हजार इंजिनिअर्सना एआयचे मूलभूत प्रशिक्षण देणार आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.