बुधवार, २२ मार्च, २०१७

कोकणातील कोकम, नाशिकची वाईन, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीला GI मानांकन - २२ मार्च २०१७

कोकणातील कोकम, नाशिकची वाईन, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीला GI मानांकन - २२ मार्च २०१७

* कोकणातील कोकम, नाशिकची वाईन, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरीला GI मानांकन मिळाले असून त्यांना आता जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. कारण आता जीआय टॅग मिळाला आहे.

* जीआय टॅग म्हणजे जिऑग्राफिकल इंडेक्स. हा दर्जा मिळाल्याने त्या गोष्टीच्या गुणवत्तेला जागतिक मान्यता प्राप्त होते.

* कोकणातील कोकम, नाशिकची वाईन, महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी यांना त्याचा फायदा होणार आहे.

* जीआय मानांकन म्हणजे - विशिष्ट भूभागातील माती, पाणी, आणि वातावरणामुळे तसेच शेतकऱ्यांच्या व्यवस्थापन कौश्यल्यातून शेतीमालास रंग, वास, चव, आकार, आदी, गुणवैशिष्ट्यामध्ये वेगळेपण लाभते. अशा दर्जाची खात्री मात्र जीआय अर्थात भौगोलिक निर्देशन मानांकनातून मिळते.

* भौगोलिक निर्देशांक अधिकारांतर्गत उत्पादनाची क्षमता दर्जा, आणि इतर वैशिष्ट्यांचा समावेश होतो. हस्तकला आणि कापड उत्पादने, कृषी उत्पादने, तसेच तयार वस्तू यांना विविध पातळीवर उत्पादनाचा दर्जा आणि अन्य बाबीमध्ये वाढ किंवा घट होऊ शकते.

* मात्र भौगोलिक निर्देशनाचे अधिकार मिळाल्यास त्या उत्पादनाचा दर्जा, भौगोलिक पीक उत्पादनाचे क्षेत्र, विभाग, देश, आदींबाबत विश्वासार्हता निर्माण होते.

* जीआय मानांकनाचे होणारे फायदे - शेतीमालास प्रतिष्ठा, शेतीमालाची नेमकी ओळख, गुणवत्तेची खात्री, आंतरराष्ट्रीय बजबरपेठेत संधी.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.