मंगळवार, २१ मार्च, २०१७

बिल गेट्स जगात तर मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - फोर्ब्झ २२ मार्च २०१७

बिल गेट्स जगात तर मुकेश अंबानी देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - फोर्ब्झ २२ मार्च २०१७

* भारतीय अब्जाधीशांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे संचालक मुकेश अंबानी अव्वल स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती २३.२ अब्ज डॉलर आहे.

* तर मायक्रोसॉफ्टचे अध्यक्ष बिल गेट्स जगात सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत पहिल्या स्थानी आहेत. फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वाधिक श्रीमंतांच्या यादीत जाहीर केली आहे.

* गेट्स हे सलग चौथ्या वर्षी पहिल्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८६ अब्ज डॉलर आहे. गेट्स सलग चौथ्या वर्षी पहिल्या स्थानी राहिले आहेत.

* बर्कशायर हॅथवे कंपनीचे मालक वॉरेन बफेट यांची संपत्ती ७५.६ अब्ज डॉलर असून ते दुसऱ्या स्थानी आहेत.

* अव्वल दहा जणांच्या यादीत अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस, फेसबुकचे संस्थापक मार्क झुगरबर्क ५ व्या स्थानी आहेत. याशिवाय ओरॅकलचे संस्थापक लॅरी एलिसन सातव्या स्थानी आहेत.

* १३ व्यक्तींना पहिल्यांदाच या यादीत स्थान देण्यात आले आहे. भारताकडून मुकेश अंबानी हे सर्वाधिक श्रीमंत आहेत. त्यांची २३ अब्ज डॉलर असून ते यादीत ३३ व्या स्थानी आहेत.

* त्यांच्यानंतर लक्ष्मी मित्तल, अझीज प्रेमजी, दिलीप संघवी, शिव नाडर आहेत. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.