मंगळवार, २१ मार्च, २०१७

एमपीएससी २०१६ चा मुख्य परीक्षेत भूषण अहिरे व मुलींमध्ये पूनम पाटील प्रथम - २० मार्च २०१७

एमपीएससी २०१६ चा मुख्य परीक्षेत भूषण अहिरे व मुलींमध्ये पूनम पाटील प्रथम - २० मार्च २०१७

* राज्य लोकसेवा आयोग एमपीएससी च्या वतीने घेण्यात येणाऱ्या २०१६ रोजी घेण्यात आलेल्या मुख्य परीक्षेत नाशिकचा भूषण अहिरे हा विद्यार्थी राज्यात प्रथम आला आहे. तर मुलींमध्ये साताऱ्याची पूनम पाटील प्रथम आली आहे.

* भूषण याने अभियांत्रिकी शाखेची पदवी मिळविली आहे. त्याची गट अ मधून उपजिल्हाधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे.

* या परीक्षेतून राज्यातील एकूण १३० राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदासाठी यशस्वी उमेदवारांची यादी गुरुवारी दुपारी जाहीर करण्यात आली.

* यात गट अ मधून ७१ तर गट ब मधून ५९ अशा १३० उमेदवारांचा समावेश आहे. तर साताऱ्याची पूनम संभाजी पाटील हि विद्यार्थिनी महिलांमधून प्रथम आली आहे.

* या परीक्षेसाठी प्रविष्ट १ लाख ९१ हजार ५५३ विद्यार्थयामधून १५७५ उमेदवारांनी पूर्व परीक्षेत यश मिळविले होते. यात मुख्य परीक्षेसाठी ४१८ उमेदवार यशस्वी ठरले.

* यानंतर तिसऱ्या टप्प्यात १६ ते २४ जानेवारी दरम्यान पार पडलेल्या मुलाखतीत १३० उमेदवारांनी अंतिम यश मिळविले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.