रविवार, १२ मार्च, २०१७

२०२० पर्यंत भारत जगातील ३ रे मोठे कारचे मार्केट - १३ मार्च २०१७

२०२० पर्यंत भारत जगातील ३ रे मोठे कारचे मार्केट - १३ मार्च २०१७

* २०२० पर्यंत भारत जगातील ३ रे मोठे कारचे मार्केट असेल, असे मत सुझुकी मोटार कॉर्पोरेशनने व्यक्त केले आहे. भारतीय बाजारपेठेच्या वृद्धीत मोठी भूमिका निभावण्यासाठी तयार असल्याचेही कंपनीने म्हटले आहे.

* भारतातील कार बाजारात मारुती सुझुकी इंडियाचा वाटा ५०% पेक्षा अधिक आहे. कंपनीने २०२० पर्यंत आपले उत्पादन २० लाख कार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

* त्यानुसार गुजरातमधील प्रकल्पाचे काम सुरु केले आहे. सुझुकी मोटार कॉर्पोरेशनचे कार्यकारी महाव्यवस्थापक किन्झी साईतो यांनी जिनिव्हा मोटार शोच्यावेळी सांगितले की भारत जगातील तिसरा मोठा कारचा बाजार बनत आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.