मंगळवार, २८ मार्च, २०१७

महाराष्ट्र राज्यात उन्नत शेती समृद्ध शेती अभियानाचा प्रारंभ - २९ मार्च २०१७

महाराष्ट्र राज्यात उन्नत शेती समृद्ध शेती अभियानाचा प्रारंभ - २९ मार्च २०१७

* मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यातील शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उन्नत शेती समृद्धी शेतकरी अभियानाचा शुभारंभ केल्याची माहिती कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली.

* अभियानांर्गत तालुका हा विकास घटक मानून आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार या वर्षीपासून कृषी विकास आणि उत्पादन वाढीसाठी तालुका हा घटक ठरवून नियोजन करण्यात आले.

* यानुसार ५ वर्षे बियाणे पुरवठ्याचा आराखडा, कृषी यांत्रिकीकरण मोहीम, १ कोटी ६ लाख शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप, ठिबक सिंचनासाठी तातडीने पूर्वसंमती.

* आठ हजार कांदा चाळींची उभारणी यांचे नियोजन, शासनाचे सदर अनुदान थेट शेतकऱ्यांच्या आधारशी लिंक करून बँक खात्यावर देण्याचे नियोजन. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.