बुधवार, १ मार्च, २०१७

जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई २१ व्या क्रमांकावर - २ मार्च २०१७

जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई २१ व्या क्रमांकावर - २ मार्च २०१७

* नाईट फ्रॅंक अहवालानुसार मुंबईने टोरांटो, वॉशिंग्टन, मॉस्को सारख्या जगप्रसिद्ध शहरांनाही मागे टाकले आहे. जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबई २१ व्या क्रमांकावर आहे.

* जगातील सर्वाधिक श्रीमंत लोकसंख्या असलेल्या ८९ देशातील १२५ शहरांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्यानुसार गेल्या दशकभरात भारतात २९० टक्क्यांनी अतिश्रीमंतानी वाढ झाल्याचे दिसून आले.

* भविष्यतील संपत्तीधारकांच्या यादीत मुंबईचा ११ वा क्रमांक लागतो. या यादीत मुंबईने शिकागो, सिडनी, पॅरिस, सेऊल, दुबई, यांना मागे टाकले आहे.

* सर्वात महागड्या मुख्य निवासी प्राईम रेसिडेन्शियल शहरामध्ये मुंबई १५ व्या स्थानी आहे.

* नाईट फ्रॅंक अहवाल - जगभरातल्या ८९ देशातील १२५ शहरांचा अभ्यास २०० कोटीहून अधिक संपत्ती असलेल्या लोकांची नोंद.

* भारतातील सर्वाधिक १३४० श्रीमंत मुंबईत, दिल्लीत ६८०, कोलकाता २८०, हैद्राबाद २६० श्रीमंत राहतात. २०१५ पासून पुणे, हैद्राबाद, बंगळुरू, मुंबईत अतिश्रीमंतांची संख्या वाढत आहे.

* भारतातील अतिश्रीमंताचा सिंगापूर, युके, यूएस, आणि हॉंगकॉंग मध्ये घर घेण्याकडे कल.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.