सोमवार, १३ मार्च, २०१७

मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार - १४ मार्च २०१७

मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी शपथ घेणार - १४ मार्च २०१७

* मनोहर पर्रीकर गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी ५ वाजता पर्रीकरांचा शपथविधी होणार आहे.

* गोवा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस १७ जागा, भाजपला १३ जागा, महाराष्ट्र गोमंतक पार्टी ३ जागा, गोवा फॉरवर्ड पक्षाला ३ जागा, अपक्षांना ३ जागा आणि राष्ट्रवादी काँग्रेसला १ जागा आहे.

* काँग्रेस मोठा पक्ष ठरला असून मनोहर पर्रीकर यांना मुख्यमंत्री करण्याच्या अटीवर महाराष्ट्र गोमंतक पक्ष आणि गोवा फॉरवर्ड पार्टी आणि २ अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे.

* गोव्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मनोहर पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रिपदाचा राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपविला आहे. आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जीनी राजीनामा स्वीकारला आहे. त्यामुळे अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याकडे पुन्हा एकदा संरक्षण मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.