बुधवार, ८ मार्च, २०१७

निशाचर जातीच्या नवीन बेडकांच्या ७ प्रजातीचा पश्चिम घाटात शोध - ९ मार्च २०१७

निशाचर जातीच्या नवीन बेडकांच्या ७ प्रजातीचा पश्चिम घाटात शोध - ९ मार्च २०१७

* मुलांच्या अंगठ्यावर बसू शकतील इतक्या लहान निशाचर जातीच्या नवीन बेडकांच्या ७ प्रजातीचा पश्चिम घाटात शोध लागला आहे. गेल्या ५ वर्षाचे हे फलित आहे.

* दिल्ली विद्यापीठाच्या दोन वैज्ञानिकांनी पश्चिम घाट परिसरात हे बेडूक शोधले असून ते आतापर्यंत सापडले नव्हते. या बेडकांचा अधिवास माहिती नव्हता. त्यांचे संदेशवहन हे किटकासारखे असते.

* वाघ आणि हत्तीइतकेच या लहान उभयचर प्राण्यांचे संवर्धन गरजेचे आहे. पश्चिम घाटातील २२% बेडूक हे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. नवीन सात प्रजातींपैकी पाच वांशिक धोक्याच्या मार्गावर असून त्यांचे संवर्धन तातडीने होणे गरजेचे आहे.

* बेडकांच्या लहान प्रजाती या स्थानिक पातळीवरही असतात पण त्यांच्याकडे त्यांच्या आकारामुळे दुर्लक्ष होते. भारतात लहान बेडकांचे संवर्धन केले जाते. आतापर्यंत निशाचर बेडकात २८ प्रजाती होत्या त्यात तीन १८ मिमी आकाराच्या होत्या.

* आता ही संख्या ३५ झाली असून त्यातील २०% लहान आकाराच्या प्रजाती आहेत. ७० ते ८० दशलक्ष वर्षीपासून असित्वात असलेल्या प्रजातींचे प्रतिनिधित्व या प्रजाती करतात.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.