गुरुवार, ९ मार्च, २०१७

प्रसूती रजा विधेयकाला लोकसभेत मंजुरी - १० मार्च २०१७

प्रसूती रजा विधेयकाला लोकसभेत मंजुरी - १० मार्च २०१७

* मॅटर्निटी लिव्ह बिल अर्थात प्रसूती रजा विधेयक लोकसभेत आवाजी मतदान पद्धतीने मंजूर करण्यात आले आहे. महिलांना प्रसूतीसाठी १२ आठ्वड्याऐवजी आता २६ आठवडे प्रसूती रजा मिळणार आहे.

* त्यामुळे भारतातील जवळपास १८ लाख महिला कर्मचाऱ्यांना या विधेयकाचा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे ही रजा भरपगारी असणार आहे.

* या नव्या विधेयकामुळे सरकारी आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे. सरकारी नोकरीत काम करणाऱ्या महिलांना हि सुविधा याआधीच होती. आता खाजगी क्षेत्रातील महिलांना सुद्धा रजा देण्यात येणार आहे.

* कॅनडा आणि नॉर्वेनंतर महिला कर्मचाऱ्यांना इतकी मोठी प्रसूती रजा देणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.