गुरुवार, ९ मार्च, २०१७

देशातील ५ वर्षापेक्षा कमी वयाची निम्म्यापेक्षा अधिक बालके अशक्त - १० मार्च २०१७

देशातील ५ वर्षापेक्षा कमी वयाची निम्म्यापेक्षा अधिक बालके अशक्त - १० मार्च २०१७

* देशातील ५ वर्षापेक्षा कमी वयाची निम्म्यापेक्षा अधिक बालके अशक्त असल्याची चिंताजनक माहिती कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून समोर आली आहे.

* देशातील पाच वर्षापेक्षा कमी वयोमान असलेल्या मुलांची शारीरिक स्थिती अशक्त असल्याने ही मुले अतिशय सहजतेणे संसर्गाना बळी पडतात.

* यासोबत शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे या मुलांच्या शारीरिक वाढीवर परिणाम होतो. असे कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवाल सांगतो.

* पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या ३८% मुलांची वाढ योग्य प्रमाणात झालेली नाही. यासोबत २१% मुले दुर्बल आणि ३६% मुले ही कमी वजनाची असल्याचे या सर्वेक्षणात दिसुन आले.

* देशातील निम्म्यापेक्षा जास्त गर्भवती महिला अशक्त आहेत. गर्भवती महिला अशक्त असल्याने त्यांच्या मुलांच्या वाढदेखील योग्य प्रमाणात होत नाही.

* १५ ते ४९ वयोगटातील ५३% महिला आणि २३% पुरुष अशक्त असल्याचे कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाचा अहवालात नमूद करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.