मंगळवार, २१ मार्च, २०१७

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०१७-२०१८ - २१ मार्च २०१७

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०१७-२०१८ - २१ मार्च २०१७

* महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प २०१७-२०१८ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प शनिवारी विधानसभेत सादर केला. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा तसेच शिवसेना आणि भाजप युतीचा हा तिसरा अर्थसंकल्प होय.

* येत्या १ जुलैपासून देशभरात वस्तू व सेवा कराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे देशभरात एकच कर लागू होणार आहे.

[ अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे ]

* सोलापूर, चंद्रपूर, अमरावती विमानतळाच्या विकासासाठी ५० कोटीची तरतूद.

* पंतप्रधान सडक योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यासाठी ५७० कोटीची तरतूद.

* पुढील दोन वर्षात १० हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार.

* राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यावर २९,६२१ रुपयांचे कर्ज. थकीत योजनेसाठी १ हजार २०० कोटीची तरतूद.

* जलयुक्त शिवार योजनेमधून ५ हजार गावे पाणी टंचाईमुक्त करणार.

* यवतमाळ, नाशिक, पेठ सांगली, येथे कृषी महाविद्यालय उभारणार.

* रस्ते बांधकाम आणि डागडुजीसाठी ७ हजार कोटी रुपयाची तरतूद.

* मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाला २५ कोटींचा निधी.

* वीज आणि पाणी वाचविण्यासाठी हरित इमारतीच्या निर्मितीवर भर देणार.

* राज्यातील प्रलंबित तीन रेल्वे प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून १५० कोटी रुपयाची तरतूद.

* राज्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार.

* पुढील ३ वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प.

* महाराष्ट्राचा विकास दर ९.४%.

* पुढच्या ३ वर्षात राज्याचा विकास दर दोन आकडी करण्याचा संकल्प.

* मराठवाड्यातील कृष्णा खोरे पाणी प्रकल्प येत्या ४ वर्षात पूर्ण करणार.

* सण २०२१ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचा प्रयत्न.

* मुंबई आणि नागपूर मेट्रोसाठी ७०० कोटीची तरतूद.

* डायल ११२ प्रकल्प राबविणार. पोलीस दल, ऍम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड, या सेवा एकाच नंबरवर मिळणार.

* कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वाईप मशीन स्वस्त करणार.

* जिएसटी येईपर्यंत धने, ओले खजूर, आमसूल, हळद, मिरची, चिंच, लिंबू, गहू, तांदळावरील कर माफ.

* माती परीक्षण यंत्र आणि दूध तपासणी यंत्र स्वस्त होणार.

* मराठी भाषेच्या संवर्धनासाठी कार्यंवित केलेल्या प्रकल्पासाठी १७ कोटी ३२ लक्ष रु निधीची तरतूद.

* करणखान्याचा ऊस खरेदी कर माफ होणार.

* देशी आणि विदेशी दारू महागणार.

* देशी आणि विदेशी मद्यवर लॉटरी वगळता कोणत्याही वस्तूवर करवाढ प्रस्तावित करत नाही.

* ऑनलाईन पेपर लॉटरी महागणार.

* राज्य कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन लागू करण्याचा मानस.

* राज्यातील शासकीय इमारती २५ वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याचा निर्णय.

* नवी मुंबई, मीरा भाईंदर, अमरावती, चंद्रपूर मध्ये सीसीटीव्ही बसविणार.

* रस्ते अपघात टाळण्यासाठी यांत्रिकीकरण सुविधांसाठी ३४ कोटीची तरतूद.

* न्याययंत्रणेच्या सक्षमीकरणासाठी १०१४ कोटीची तरतूद.

* मुंबईत स्कुल ऑफ ड्रामा सुरु करणार.

* पोलिसांच्या घरासाठी ३२५ कोटीची तरतूद.

* १० ते ४० लाखापर्यंत स्मार्ट ग्राम योजनेला बक्षीस देणार.

* पंढरपूरच्या विकासासाठी निर्मलवारी योजनेअंतर्गत ३ कोटीची तरतूद.

* छत्रपती शिवाजी महाराज, इंदू मिल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे व अन्य स्मारकाच्या उभारणासाठी २०० कोटीची तरतूद.

* सिंधुदुर्ग, रायगड किल्ला आणि लोणार सरोवराचा विकास करणार.

* तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी १०० कोटी.

* महिला आयोगासाठी ७ कोटी ९४ लाखाचा निधी उपलब्द केला जाईल.

* अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्यासाठी ३१० कोटी ५७ लाख.

* व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या पूर्व तयारीसाठी ८ कोटी.

* गावागावातील पर्यावरण विषयक योजनेसाठी ८ कोटी.

* पेंच, नागझिरा, नवेगाव, अशा व्याघ्र प्रकल्पात पर्यटन प्रोत्सहन देण्यासाठी यावर्षी ८० कोटीची तरतूद.

* वन्य प्राण्यांचा पिकांना त्रास रोखण्यासाठी योजना २५ कोटीची तरतूद.

* १०० टक्के कुटुंबाना गॅस सिलिंडर देणार.

* राज्यातील अल्पसंख्यांक नागरिकांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावण्यासाठी १२५ कोटीची तरतूद.

* राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानासाठी २११ कोटीची तरतूद.

* स्वच्छ महाराष्ट्र अभियानासाठी १६०५ कोटीची तरतूद.

* पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महाइंफ्रा हि संस्था स्थापन केली जाणार.

* व्याघ्र प्रकल्पसाठी ८० कोटीची तरतूद.

* शासकीय आणि वैद्यकीय बांधकामाच्या बळकटीकरणासाठी ५५९ कोटीची तरतूद.

* नगरपालिकांच्या विकासासाठी ११०० कोटीची तरतूद.

* औरंगाबादेत राष्ट्रीय विधी विद्यापीठ उभारणार.

* बंदर जोडणी प्रकल्पाला चालना देण्यासाठी ७० कोटी.

* मिहान विमानतळासाठी १०० कोटी.

* मुंबई आणि पुणे मेट्रोसाठी ७०० कोटी.

* प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरी भागात २ लाख घरांचे काम करण्यास सुरुवात करणार.

* मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत १६३० कोटीची तरतूद.

* राज्यात वीज पाणी वाचवण्यासाठी ग्रीन इमारत निर्मितीवर भर.

* ३० कोटीची कामे १९५ कामे प्रस्तावित. ३ हजार कोटीची मदत लगेच देणार.

* पंतप्रधान सडक योजनेला ५७० कोटी रुपये देणार.

* चंद्रपूरमध्ये सैनिकी शाळा उभारणार, टप्प्याटप्प्याने २०० कोटीची तरतूद.

* रस्ते बांधणी आणि सुधारणेसाठी ७००० कोटी रुपयाची तरतूद.

* मराठवाड्यातील ४ हजार व विदर्भातील १०० गावामध्ये शेतीला संरक्षण देण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प.

* ३५ उद्योगसमूहासोबत सामंज्यस करार, औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकिकरण करणार.

* मराठवाड्यातील कृष्णा खोरे प्रकल्प येत्या ४ वर्षात पूर्ण करणार.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.