सोमवार, १३ मार्च, २०१७

संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार अरुण जेटलींकडे - १४ मार्च २०१७

संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार अरुण जेटलींकडे - १४ मार्च २०१७

* मोदी सरकारच्या संरक्षण मंत्रालयाचा कार्यभार पुन्हा एकदा अरुण जेटलींकडे आला आहे. गोव्याचे मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यासाठी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

* मे २०१४ मध्ये मोदी सरकारच्या संरक्षण मंत्रिमंडळाची जबाबदारी अरुण जेटली यांच्याकडे होती. तर मंत्रिमंडळ विस्तारात मनोहर पर्रीकर यांच्याकडे हि जबाबदारी आली.

* आता पुन्हा गोव्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात गोव्यामध्ये त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यानंतर भाजपने सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न सुरु केले. त्यावेळी स्थानिक पक्षांनी मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्यास तयारी दर्शविली होती.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.