बुधवार, ८ मार्च, २०१७

जगात हैदराबाद विमानतळ सर्वोत्कृष्ट - ७ मार्च २०१७

जगात हैदराबाद विमानतळ सर्वोत्कृष्ट - ७ मार्च २०१७

* एअरपोर्ट कौन्सिल इंटरनॅशनल [ACI] संस्थेतर्फे दरवर्षी जगभरातील सर्वोत्तम विमानतळाची निवड केली जाते.

* तर यात जगभरातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत हैद्राबाद विमानतळाने अव्वल स्थान गाठले आहे. वर्षाला ५० लाख ते दीड कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या विमानतळाच्या गटात हैद्राबाद विमानतळ प्रथम स्थानी आहे.

* तर वर्षाला चार कोटी प्रवाशांची वर्दळ असलेल्या गटात दिल्ली मधील इंदिरा गांधी विमानतळाने २ रा क्रमांक पटकाविला आहे.

* विमानतळावर मिळणाऱ्या सुविधेच्या आधारे ही निवड केली जाते. यात विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येच्या आधारे विमानतळांची विभागणी केली जाते.

* हैद्राबादमधील जीएमआर आंतरराष्ट्रीय विमानतळाने २०१६ मधील जगातील सर्वोत्तम विमानतळाच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे. जीएमआर हैद्राबादच्या सीईओ यांनी याचे सर्व श्रेय सर्व कर्मचाऱ्यांना दिले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.