गुरुवार, २ मार्च, २०१७

वस्तू व सेवा कराचा सर्वोच्च शिखर दर २० टक्के - ४ मार्च २०१७

वस्तू व सेवा कराचा सर्वोच्च शिखर दर २० टक्के - ४ मार्च २०१७

* वस्तू व सेवा कर [जीएसटी] परिषदेने आदर्श वस्तू व सेवा कर विधेयकात शिखर दर [कराचा सर्वोच्च दर] १४% वरून २०% करण्यात आला आहे.

* भविष्यात कराच्या दरात वाढ करायची झाल्यास पुन्हा संसदेकडे जाण्याची गरज पडू नये, यासाठी हा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

* अधिकारांच्या मते शिखर दरातील बदलामुळे कराच्या स्लॅबमध्ये कोणताही बदल होणार नाही. सध्या ५, १२, १८, आणि २८% असे जीएसटीचे स्लॅब प्रस्तावित आहेत. भविष्यात गरज पडल्यास बदल करण्यात सोपे जावे यासाठी शिखर दर २०% प्रस्तावित केले आहे.

* आदर्श जीएसटीचा कायद्याचा मसुदा गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सार्वजनिक करण्यात आला होता. यात शिखर दर १४% ठेवण्यात आला होता. आता तो २०% ठेवण्यात आला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.