रविवार, २६ मार्च, २०१७

महाराष्ट्राच्या पोलीस दलात नवीन एम्बिस प्रणाली येणार - २६ मार्च २०१७

महाराष्ट्राच्या पोलीस दलात नवीन एम्बिस प्रणाली येणार - २६ मार्च २०१७

* गुन्ह्याची उकल करून गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी न्यायालयात ठोस पुरावे सादर करता यावे यासाठी पोलीस आधुनिकीकरण राज्य पोलीस दलात आता नव्याने [ एम्बीस - ऑटोमेटेड मल्टीमॉडेल बायोमेट्रिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम ] प्रणाली वापरण्याचा महत्वपुर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

* तसेच या प्रणालीमुळे आरोपीच्या बोटांचे ठसे व छायाचित्रांची डिजिटल पद्धतीने साठवणूक करून त्याचा वापर गुन्ह्यांचा शोध लावण्याबरोबरच गुन्हे सिद्धतेचे प्रमाण वाढवण्यासाठी निश्चित होईल.

* मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पोलीस दलाच्या आधुनिकीकरणा बरोबरच अपराध सिद्धीचे प्रमाण वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे.

* एम्बीस प्रणाली याच उपाययोजनांचा एक भाग असून जगातील ही सर्वोत्तम प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.