रविवार, १२ मार्च, २०१७

सीबीएससीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना पाचऐवजी ६ विषयांचा अभ्यास - १२ मार्च २०१७

सीबीएससीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना पाचऐवजी ६ विषयांचा अभ्यास - १२ मार्च २०१७

* पुढील वर्षीपासून दहावीच्या विद्यार्थ्यांना ५ ऐवजी सहा विषयांचा अभ्यास करावा लागणार आहे. कारण सिबीएससी त्यांची मूल्यांकन पद्धती बदलली आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना सध्या दोन भाषा, गणित, व विज्ञान हे विषय आहेत. आता सहा विषय सक्तीचे राहणार आहे.

* पुढील वर्षांपासून विद्यार्थ्यांना व्यवसायिक विषययातून एक विषय निवडावा लागेल. व तो ५ विषयापेक्षा जादाचा म्हणजे सहावा असेल.

* २०१७-१८ या वर्षात व्यवसायिक अभ्यासक्रम असलेला विषय सक्तीचा राहणार आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन म्हणजे सीबीएसई या संस्थेने दहावीच्या परीक्षेची फेररचना केली आहे.

* एकूण सहा विषय सक्तीचे झाले आहेत. जर एखादा विद्यार्थी विज्ञान, समाजशास्त्रे गणित यापैकी एका विषयात नापास झाला तर त्याजागी सहावा म्हणजे व्यवसायिक विषय गृहीत धरला जाईल.

* विद्यार्थ्यांना सहाव्या व्यवसायिक विषयात किरकोळ विक्री व्यवसायाचे स्वरूप, माहिती तंत्रज्ञान, अर्थ बाजारपेठांचा परिचय, पर्यटन सौन्दर्य अभ्यासक्रम, मूलभूत शेती, अन्न उत्पादन, कार्यालयीन कामे, बँकिंग आणि विमा, विपणन व विक्री, आरोग्य काळजी असे पर्याय असतील.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.