मंगळवार, २१ मार्च, २०१७

जीएसटीच्या ४ पूरक विधेयकाच्या मसुद्यास मंत्रिमंडळाची मंजुरी - २० मार्च २०१७

जीएसटीच्या ४ पूरक विधेयकाच्या मसुद्यास मंत्रिमंडळाची मंजुरी - २० मार्च २०१७

* केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत १ जुलैपासून देशभर जीएसटी लागू करण्याचे ठरविले आहे. त्यासाठी जोरदार तयारी चालू झाली असून त्याचाच एक भाग म्हणून जीएसटीच्या ४ पूरक विधेयकाच्या मसुद्यास मंत्रिमंडळाची मंजुरी दिली असून ही विधेयके संसदेत सादर केली जातील.

* केंद्राने जीएसटी लागू करण्यासाठीचे केंद्रीय जीएसटी सीजीएसटी विधेयक, आंतरराज्यीय व्यापारसाठीचे एकीकृत जीएसटी आयजीएसटी विधेयक आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी यूजीएसटी विधेयक ही ती विधेयके होत.

* केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत केवळ जीएसटी विधेयकेच मंजुरीसाठी ठेवण्यात आली होती. सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की लवकर जीएसटी लागू करण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.