बुधवार, ८ मार्च, २०१७

देशातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील ३०% तरुणांकडे रोजगार नाही - ८ मार्च २०१७

देशातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील ३०% तरुणांकडे रोजगार नाही - ८ मार्च २०१७

* भारताची अर्थव्यवस्था जगातील इतर देशांच्या अर्थव्यवस्थांच्या तुलनेत दुप्पट वेगाने वाढत आहे. मात्र रोजगाराचा विचार केल्यास भारतातील स्थिती वाईट असल्याचे समोर आले आहे.

* ओसीईडीच्या अंदाजानुसार यंदा भारताचा आर्थिक विकास दर ७% आहे. मात्र देशात नोकऱ्यांचे प्रमाण वाढत नाही असे अहवाल सांगतो.

* देशातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील ३०% तरुणांकडे रोजगार आणि पुरेसे शिक्षण किंवा रोजगाराभिमुख प्रशिक्षण नसल्याची चिंताजनक आकडेवारी ओसीडीईच्या अहवालातून समोर आली आहे.

* हि आकडेवारी ओसीडीईच्या सरासरीच्या मापदंडाच्या दुप्पट तर चीनच्या तीनपट आहे. बेरोजगारी आणि अपुरे शिक्षण झालेला युवा वर्ग ही भारतासमोरील मोठी समस्या आहे.

* भारताची लोकसंख्या वेगाने वाढते परंतु रोजगार वाढत नाही असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

* नोकऱ्यांची उपलब्द्ता कमी असल्याने तरुण वर्गाकडून शिक्षणाला फारसे प्राधान्य दिले जात नाही. भारतातील कामगार कायदे जटिल आहेत. असे मत ओईसीडीचे इंडिया चे अध्यक्ष इसाबेल्ले जोमार्ड यांनी सांगितले.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.